पहिला पाऊस
पहिला पाऊस
मेघ दाटूनी आकाशात येतातं
पहिला पाऊस भूवरी कोसळतात
मृग नश्रत्राला सुरूवात होता
ओली चिंब वसुंधरा होतातं
पहिला पाऊस आनंद देई
लाही वैशाख शितल करी
ओसंडती नदी,नाले, तलाव,सागर
निसर्गाची ही किमया सारी
पाऊसधारा पडती जमिनीवर
चोहीकडे संपूर्ण दिसे हिरवेगार
निसर्ग रम्य दिसती छान
झाडे,वेली लहरतांना दिसे सुंदर
पहिला पाऊस पडती रानोमाळ
पाखरांचा थवा उडून येेती
मोर नाचती थुई थुई तालातं
पक्षांचा आवाज गोड मधूर येती
पहिला पाऊस भूवरी बरसतात
बळीराजाला मनात आनंद होतो
शेतीच्या कामाला तो लागतो
बी बीयाणे घेवून पेरणी करतो
रानोमाळातं रोपे सर्वजन लावा,
झाडे लावा,झाडे जगवा
संगोपण,सवर्धन करा
पाणवायू देई मानवा

