नातं प्रेमाचं
नातं प्रेमाचं


तुझं माझं नातं जन्मोजन्मीचं, तुफानी वादळाने नाही डगमगणार वृक्ष जसं स्वताच्याच छायेत सुखावतं,
तसंच मी तुझ्या प्रितीत न्हाऊन जाणार तुझं छोटंसं प्रफुल्लित करणार हास्य,
संकटांना सामोरं जाण्याची ताकत देत साताजन्म तुझ्यासमवेत हसत जगणं,
नुसत्या विचाराने अंगी बळ संचारतं
*आयुष्यभर* *मी* *तुझ्या* *सोबत* *आहे*,
तुझे हे उच्चार माझ्यासाठी लाखमोलाचे कधीही तुझा हिरमुसलेला मुखडा पाहण्या,
माझे नयन असे सहज नाही खुलायचे...
आपल्या दोघांचं हे निरागस अन गोड नातं,
*नायलॉन* दोरी
पेक्षाही अधिक अतूट आहे
*अबीरगुलालावाणी* प्रेमाची नको मज उधळण, भेटीनंतरही
माझ्या *मना* तुझी ओढ हवी आहे
तुझ्या माझ्या नात्याला नक्की काय नाव देऊ,
गोंडस, गोड स्वभाव तुझा अगदी मनमिळाऊ साऱ्या स्वप्नांना पूर्णत्वास दोघांनी मिळुन नेऊ,
सुखसमाधानाची अफाट संपत्ती या जन्मी पाहू
आयुष्यभराचं हे नातं ठरेल जगण्याची नवी दिशा,
तुझ्याच प्रितीत न्हाऊन गेलो, चढली मज नशा
*तुझाच* *मी*, *माझाच* *तु* असाच असावा दिनक्रम,
विश्वास मज तुझ्यावर दाट, चंचल मनी नसावा भ्रम....!!!