ते झाड
ते झाड


घनघोर काळोखी रात्र अन
नदीकडे जाणारी पायवाट,
याच वाटेवर एक झाड उभे
घेऊन अंगावर अतृत्पांची वस्ती दाट
असाल तुम्ही खरे धाडसी
जा एकदा अमावस्येच्या रात्री
कैक आढळतील फांद्यांवरती बसलेले
मृत्यूने लावली ज्यांच्या जीवनास कात्री
नवऱ्याने जाळलेली तुकी
पाहिल तुमच्याकडे होऊन मुकी
फेस गाळत गेलेला जना
बोलावील जवळ करूनी खुणा
गळफास लावलेली नाजूक पोर
वाट पाहते सावजाची घेऊन दोर
नका घालु स्वतःशीच वाद
मान मोडलेला वेडा घालेल हळूच साद
कुत्र्यांच्या भेसूर रडण्याने भानावर येसाल
हळुच तिथुन पाय काढून घेसाल
पण आता वेळ निघून गेलेली असेल
तुमच्या नावाची एक फांदी
पुढच्या अमावस्येला त्या झाडावर दिसेल