तुझ्या आठवणीत सखे
तुझ्या आठवणीत सखे

1 min

540
तुझ्या आठवणीत सखे
होते जीवाचं गं पाणी
मैना गेली उडून दूर
राघु गातो विरहाची गाणी
तुझ्या आठवणीत सखे
होतो कासावीस जीव
मोर झुरत मरतो
नाही लांडोरीला कीव
तुझ्या आठवणीत सखे
मन उदास भकास
कोकिळा गाते गाणी
चातकाला थेंबभर प्रेमाची आस
तुझ्या आठवणीत सखे
डोळ्यात अश्रूंचा सागर
कावळा हृदयातून हद्दपार
चिमणी उभारते नवं घर