कळी
कळी


उमलण्या आधीच तोडळी कळी
झाडावरून फुलण्या आधीच बळी
ना गंध ना सुगंध दरवळला न वेळी
उमलण्या आधीच पडली कळी
झाडावरून तूटली मायेची पळी
बहरण्या फुलण्या भाग्य न मिळी
उमलण्या आधीच चिरडली कळी
तोडणाऱ्या समाजाची पडली बळी
दोष ना झाडाचा ना दोषी कळी ।
****************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )