STORYMIRROR

Priti Dabade

Comedy

4  

Priti Dabade

Comedy

लग्न

लग्न

1 min
278


सोहळा होता

माझं लग्न

सर्वच होते

त्यात मग्न


अक्षदा पडल्या

मग डोईवर

लोकांचे लक्ष

जेवणाच्या पत्रावळीवर


बसली पहिली

पंगत मोठी

जेवणात होती

बासुंदीची वाटी


दुसऱ्या पंगतीत

भात संपला

बासुंदीने तर

तळच गाठला


शेवटी जेवण

हॉटेलमधून मागवले

कसेबसे भोजनकार्य

पार पडले



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy