STORYMIRROR

Priti Dabade

Action Inspirational Children

3  

Priti Dabade

Action Inspirational Children

वाचन(अभंग)

वाचन(अभंग)

1 min
268


वाचन करता।कार्य घडे छान।

होई शब्द जाण।मेंदूमध्ये।।१।।


वाचा सावकाश।समजून घेऊ।

 एकरूप होऊ।मनोभावे।।२।।


वाचनाने घडे।प्रगती स्वतःची।

उन्नती देशाची। खरोखर।।३।।


वाचनाने होई।उच्चारही स्पष्ट।

अंधकार नष्ट।कायमचा।।४।।


ज्ञान वृद्धींगत।होई वाचनाने।

पक्के चिंतनाने। अगदीच।।५।।


वाचन घडवी। लेखन बदल।

विचारांचा कल।क्षणोक्षणी।।६।।


वाचनाचा वसा। आजन्म पाळावा।

दुसऱ्याला द्यावा।प्रत्येकाने।।७।।


वाचनाने पडे।दुःखाचा विसर।

ज्ञानाची कसर। कधी नसे।।८।।


पुस्तक सतत। बाळगावे हाती।

 नाहीतर माती। जीवनाची।।९।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action