पाणवठ्यावर...!
पाणवठ्यावर...!
गडबड गोंधळ सकाळ पारी
कानी आला भल्या यरवाळी
होती कोणाची पाण्याची पाळी
जाणत असावी सारी आळी
तिकडून आली पवारची कमळी
इकडून गेली चव्हाणांची माली
डावीकडन उगवली पाटलाची शारी
उजवीकडून मग आली कुंभाराची पारी
पाणवठ्यावर गोंधळ ऐकू आला
वाटले काहीतरी घोटाळा झाला
नळाला पाण्याचा थेंब नाही आला
म्हणून तर चौघींचा पारा चढला
इथून तिथून साऱ्यांची साल निघाली
उद्धार तर चार पिढ्यांचा झाला
तेंव्हा कोठे जीव भांड्यात पडला
जणू यांच्यामुळेच सारा इतिहास घडला
आले एकदाचे नळाला पाणी
ते पाहणारी एक दीड शहाणी
नजर चुकवून पुढे झाली
पारी म्हणाली ए तू कोण साली
चौघीजणी तुटून पडल्या
गावरान साऱ्या लाखोल्या झडल्या
पाणवठ्यावर आडव्या झाल्या
मग शमल्या अन बिन पाण्याच्या निघून गेल्या....!!