STORYMIRROR

kishor zote

Inspirational Action

4  

kishor zote

Inspirational Action

देऊ धैर्याने लढा

देऊ धैर्याने लढा

1 min
41.1K


भीती कशाला कोणाची

अशी बाळगायची ती?

पुढे चालायचे सदा

वाट जरी आडवती !

काम होते चांगलेच

असे बाजू निंदक ती

पहा स्वप्न नवतीचे

नको त्यांची रे गिनती

उठ चालत रहा तू

ध्येय तुझे खुणवती

सोड सारी निराशा तू

साद देत बोलावती

नको हारू हिम्मत रे

दूर सार व्यसने ती

देऊ धैर्याने रे लढा

जिंकायची लढाई ती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational