बालिका अत्याचार
बालिका अत्याचार
अरं माणसा माणसा
कुठे गेली तुझी माणूसकी?
असे निर्लज्ज कृत्य करताना
तुला तुझी लेक नाही का आठवली?
अरं माणसा माणसा
कुठे गेली तुझी माणूसकी?
कोमल कळी कुचकरतांना
तुला तुझी बहिण नाही का आठवली ?
अरं माणसा माणसा
कुठे गेली तुझी माणूसकी?
तिच्या किंचाळया ऐकतांना
तुला थोडी दया कशी आली नाही?
अरं माणसा माणसा
कुठे गेली तुझी माणूसकी?
स्त्री जन्माचा पालापाचोळा करताना
तुला तुझी आई कशी आठवली नाही ?
अरं माणसा माणसा
कुठे गेली तुझी माणूसकी?
कोणत्या थराला गेली तुझी वासना
माणूस म्हणून द्यायची लायकी सुध्दा नाही ?