लग्न (अभंग रचना)
लग्न (अभंग रचना)


दोन मनातील । स्वप्नाची पूर्तता ।
लग्न ती करता । दोन जीव ॥ १ ॥
एक तो मंगल । परिणय घडे ।
गुंजती चौघडे । मंडपात ॥ २ ॥
प्रसन्नता सारी । त्या वातावरणी ।
हात तो धरोणी । कायमचा ॥ ३ ॥
दाम्पत्य जीवना । सुरवात करी ।
आनदं तो घरी । दोन्ही कडे ॥ ४ ॥
सांगतो किशोर । लग्न ते करून ।
सुखी ते होवून । जीवनात ॥ ५ ॥