STORYMIRROR

Harshada JOSHI

Drama Romance

4  

Harshada JOSHI

Drama Romance

साक्ष आठवांची

साक्ष आठवांची

1 min
629

निसटून जाते वाळू

हातातून वेचताना 

आठवांचे सोहळे ते 

फोटोतून पाहताना 


वाटे हवाहवासा जो 

काळ दिसे पळताना 

उभा रोमांच करतो 

अलबम चाळताना


धडधड हृदयात

चार पाने गळताना

वाटे हुरहूर मनी

अश्रू पुन्हा ढळताना 


साक्ष देतो फोटो मला 

अश्रूतून भिजताना

होते माझे सारे जरी

दिसे दूर पळताना


आठवांचे पुस्तक हे 

भासे उलगडताना 

अंगावर मोरपिसे

वाटे आज पडताना 


साक्ष देतो प्रेमाची हे 

साठवण जपताना 

जावे शिंपीत चांदणे 

अलबम बघताना 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama