STORYMIRROR

Harshada JOSHI

Others

4  

Harshada JOSHI

Others

महासत्ता तंत्रज्ञानाची

महासत्ता तंत्रज्ञानाची

1 min
258

वाखाणण्याजोगा वाटला 

आदिमानव ते रोबोटचा प्रवास

चुलीपासून ते विद्युत शेगडीपर्यंत

पोहचवले नि वाचवले तासनतास....

दिसत नव्हतं ते दिसू लागलं

जाता येत नव्हतं तिथे जाता आलं

कष्ट झाले कमी नि मिळाला सुखाचा घास....

साऱ्या जगाला जवळ आणले 

याचे श्रेय फक्त तंत्रज्ञानास .....

अणुपासून आण्विक ऊर्जेपर्यंत 

याने घेतला फक्त प्रगतीचा ध्यास..

जगभरात फिरले पाय 

नि हातात आलं जग 

एका खटक्यात सर्वकाही 

स्वप्न की सत्य वाटे भास.....

मनासी टाकतो मागे 

आंतरजालाचिया वेगापुढे

मनामनातील व्हावे अंतर कमी

यासाठी आणशील का? तंत्रज्ञाना....

मनजोडणीचा अधिकमास......

भौतिकतेच्या मांडल्या राशी

चहूकडे शोभते ऑनलाईनची आरास....


Rate this content
Log in