वाहे डोळ्यातून सुख
वाहे डोळ्यातून सुख
1 min
287
कधी मिळेल मला ते
गेले वाकडे दावून
आता शिणलासे जीव
सुखा येतो का धावून
आता खचले मनही
किती पहावी रे वाट
यशा सांग तुझा किती
आहे रे भलता थाट
असा आला येताना तो
हास्य पांघरून गाली
जणू टपोर चांदणे
नयनी अंजन घाली
किती सोसावे सोसले
आज आकाश ठेंगणे
रडु हसता हसता
आज भिजली अंगणे
ब्रह्मनंद सहोदर
जणू सुखाचा गिलावा
ओघळतो डोळ्यातून
खऱ्या सुखाचा ओलावा
