Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Harshada JOSHI

Others


3  

Harshada JOSHI

Others


सवयींचा गुलाम

सवयींचा गुलाम

1 min 440 1 min 440

स्थिर बुद्धीवरी कोणी घातला उगाच घाला

शांत संथ मनालाही वेग भलताच आला


भावसागरात कैक उसळल्या बहु लाटा

बोलू लागल्या नव्याने अबोल अतृप्त वाटा


कुठे लाभला किनारा झाले जीवनाचे कोडे

नाही थांबले कुठेही चुकलेच माझे थोडे


चूकभूल माफ व्हावी काळ परतावा पुन्हा 

डोळे भरून पाहीन माझा झाला काय गुन्हा 


गेले वाहुनी कुठे मी उरला खाली तो गाळ

ओझे वेदनांचे मागे ठेवून गेला तो काळ


आहे बुद्धीही गहाण भावभावनांच्या पुढे

नाही थांबले कुठेही चुकलेच माझे थोडे 


सवयींचा पुरता मी झालो आहे रे गुलाम

कुरघोडी भावनांची तयास माझा सलाम


Rate this content
Log in