STORYMIRROR

Harshada JOSHI

Abstract

4  

Harshada JOSHI

Abstract

लेखणी माझी देखणी

लेखणी माझी देखणी

1 min
599

सापडले मज कवडसे

किती दूर आल्यावरती

यशोदीप लागले मनी

वर्षाखेरीतली ही भरती


नाही थांबणार आता

जोरात होऊ दे वर्षारंभ

चोखाळेल नव्या वाटा

नववर्षी फक्त समारंभ


जे जे मजला मिळाले

ते ते उधळेल यंदा

सोडणार ना कधीही

सुगंध वेचण्याचा धंदा


राहून गेली नकळत

जोडणार ती ती नाती 

काव्यातून सांगणार जगा

नाती माती नि संस्कृती


टोचून काटे हजारो

बहरेल माझी लेखणी

संकल्प घेतला जीवनी

व्हावी 'लेखणी माझी देखणी'


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract