STORYMIRROR

Harshada JOSHI

Inspirational Others

4  

Harshada JOSHI

Inspirational Others

कणाकणातला देशाभिमान

कणाकणातला देशाभिमान

1 min
315

जिथे तीर्थ आणि अमृत होते

गंगा जमुना सिंधूचे पाणी

शब्दांची होते अभंग ओवी

ज्ञाना नाम्या तुक्याची वाणी


अन्नामध्ये भाव मिसळता

प्रसादाची मग येई चव

कर्तव्यात अमुच्या भाव

आणतो सेवा रूप तव


विखुरली ख्याती आमची

झाले तुकडे लहान लहान

नतमस्तक होई शिर अमुचे

म्हणतो भारत देश महान


आमच्या मातीतून येते

जगण्याला अविरत शक्ती

होय.. मी आहे भारतीय

करते भरत रामाची भक्ती


आहेत नि असतील येथे

एकत्र, लक्ष धर्माची कुळे

तरी अंतःकरणात रुजली 

माणुसकीची खोल मुळे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational