STORYMIRROR

Harshada JOSHI

Others

4  

Harshada JOSHI

Others

जाता जाता...

जाता जाता...

1 min
532

खडतर काटेमय होता 

दोन वर्षाखालचा काळ

नशीब फळफळले की

शिजली यंदा माझी डाळ?


शिंपल्यातून आला मोती की

कोळशातून चमकला हिरा

हे वर्ष होते की आणखी काही

भासला सत्यनारायणाचा शिरा


कष्टापुढे हजारो काट्यांनी ही

घेतली यावेळेस अशी माघार

मजसाठी जे जे धडपडले

त्या सर्वांचे शतशः आभार


माझ्या आयुष्यातल्या हरेकामुळे

वाढला मम यशाचा व्यास 

प्रार्थना नि आशीर्वादानेच आहे 

माझ्या चेहऱ्यावर हास्यरास


२०१९ होता मजसाठी अनोखा

योगायोग, महाराजयोग साक्षात

यशाचे झुकते माप अताशा

भरभरून पडले माझिया पदरात


या वर्षाने जाता जाता

मला खूप काही शिकवलं

मला खूप काही देण्यासाठी

साऱ्या संकटांना हुकवलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन