ते प्रेम असते
ते प्रेम असते


ज्याच्या ठिकाणी मन आणि बुद्धी
गहाण टाकाविशी वाटते...
ते प्रेम असते....
तरणार की बुडणार काही माहीत नसतानाही
स्वतःला झोकून द्यावेसे वाटते...
ते प्रेम असते....
जिथे स्वार्थ नि अहंकार गळून पडतात
मी आणि माझे सारे विसरून जावेसे वाटते...
ते प्रेम असते...
जिथे तक्रार आणि अपेक्षा
अलवार संपून जाते...
ते प्रेम असते....
जिथे शब्द संपतात आणि
इवलेसे हृदय बोलू लागते....
ते प्रेम असते...
कधी न विटणारे
जे रसाळ फळ असते...
ते प्रेम असते...
सत्य आणि सुंदर हळवे
जे या जगतात असते...
ते प्रेम असते...
हृदयाच्या फाटकावर
जे पहिल्यांदा टक टक करते
ते प्रेम असते...
हृदयातच सदासर्वदा
जे विलीन होऊन जाते...
ते प्रेम असते...
जे तुम्हाला कधीच एकटे
राहू देत नसते....
ते प्रेम असते...
तुम्ही जिवंत आहात
याची जे सतत साक्ष देते...
ते प्रेम असते...
जिथे हृदयाची तार जुळते
अन् हृदयातच पुन्हा ठिणगी उठते...
तेच प्रेम असते...
भगवंताचे जे दुसरे नाव
आणि गोजिरे रूप असते...
ते प्रेम असते...
जिथे नकळत झुकावेसे वाटते
ज्याच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते...
ते प्रेम असते...