STORYMIRROR

Harshada JOSHI

Others

4  

Harshada JOSHI

Others

विरह गीत

विरह गीत

1 min
498

अवघड झालंय तुजविण जगणं

आता तर कुठे कळू लागलं होतं

तुझं असणं आणि दिसणं आता

माझं अस्तित्व होऊ लागलं होतं


नियतीचे पालटणार फासे उद्या

म्हणून हृदय जळू लागलं होतं

भुगा होत होता डोक्याचा पुरेसा 

विचारांचं घोंगडं भिजू लागलं होतं


विरहाच्या विचारांनी कुठे तरी रे

टाळूवरचं लोणी कढू लागलं होतं

मनाच्या खोल तळाशी अलगद

चिवट प्रेम जणू थिजू लागलं होतं


प्रेमाच्या विरहाग्नित जिवलगा रे

डोक्यात दुःख शिजू लागलं होतं

झाल्या भावना अनावर नि अमर

आठवांचं रोपट रुजू लागलं होतं


Rate this content
Log in