Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Harshada JOSHI

Classics


3  

Harshada JOSHI

Classics


गीतामृत

गीतामृत

1 min 328 1 min 328

न वाचणे लागे पुस्तके सत्तर

गीतेने दिले हरेक समस्येचे उत्तर 


गीता होई प्रत्येक संकटाची आई 

चिंता कळजीला दूर घेऊन जाई


गीता देई जगण्याला पुरेपूर ऊर्जा 

गीतेने वाढवला जगण्याचा दर्जा


हीच गीता शिकविते मजला धर्म

उत्तमातील उत्तम घडविते कर्म


कसे जगावे? सांगते ही गीता

वेचेल जो, तो न राहतो रिता


गीता देई साऱ्या भक्तास भक्ती 

गीता देई साऱ्या अशक्तास शक्ती 


गीता असे आत्मज्ञानाचे दार

गीता असे अध्यात्माचे सार


संपूर्ण जगाचे गीता हे तत्त्वज्ञान 

गीता देई हरेक जीवा आत्मभान 


Rate this content
Log in

More marathi poem from Harshada JOSHI

Similar marathi poem from Classics