STORYMIRROR

Deepa Vankudre

Classics

4  

Deepa Vankudre

Classics

माझ्या देशा, भारत देशा!

माझ्या देशा, भारत देशा!

1 min
252

विविधेत एकता, तुझी विशेषता, 

माझ्या देशा, भारत देशा!


हिममुकुट लेवून उभा उत्तर,

पूर्व, पश्चिमेस रक्षती महासागर,

दक्षिणेस पावन संगम तीर,

वरदान देई निसर्ग देवता, 

विविधेत एकता, तुझी विशेषता!

माझ्या देशा, कणखर देशा! 


वाळवंट ही, हिमवृष्टी ही

किमयागार इथे सृष्टी ही

सौंदर्य रसपान करे दृष्टि ही

चहुकडे अलभ्य रम्यता!

विविधेत एकता, तुझी विशेषता! 

माझ्या देशा, सुंदर देशा! 


भूमी आहे साधू-संतांची

भक्तीरसात न्हालेल्या भक्तांची

अजरामर साहित्यिकांची

साहित्य श्रीमंतीची राखे भव्यता!

विविधेत एकता, तुझी विशेषता! 

माझ्या देशा, अतुल्य देशा! 


राणा प्रताप, पृथ्वी, शिवराय, 

अगणित वीरांची ही माय, 

कधी न मोकलली धाय,

अशा वीर भगिनी, भार्या, माता!

विविधेत एकता, तुझी विशेषता! 

माझ्या देशा, पवित्र देशा! 


महाकाव्ये महाभारत, रामायण

भगवद्गीतेची ती शिकवण 

शिष्यास आशिष गुरुचे कंकण 

प्राचीन संस्कृतीचा वर लाभे भारता!

विविधेत एकता, तुझी विशेषता!

माझ्या देशा, मंगल देशा! 


पहाटे मंदिरात घंटा नाद

ऐकू येते अजानाची ही साद

गुरुद्वारात प्रसादाचा आस्वाद 

धर्मांचे एकरुप, दैवी दिव्यता 

हीच विविधेत एकता, तुझी विशेषता! 

माझ्या देशा, महान देशा! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics