STORYMIRROR

Archana Rahurkar

Classics

4  

Archana Rahurkar

Classics

जा रे जा माघारी

जा रे जा माघारी

1 min
368

झटपट निघालो आम्ही गवळणी रे

वाट आमची तू आडवू नको... रे

करु नकोस जोराजोरी...

सुदाम्या... जा रे जा माघारी

सुदाम्या... जा रे जा माघारी

सुदाम्या‌... जा रे जा माघारीllधृll


दह्या, दुधाच्या घेऊन घागरी

आम्ही निघालो मथुरा बाजारी

वाट आमची तू आडवून रे...

का करतोस अशी शिरजोरी...

सुदाम्या... जा रे जा माघारी  

सुदाम्या... जा रे जा माघारीll १ll


करतोस का रे... तू असली खोडी...

खडा मारीसी तू माठ रे फोडूनी...

नाजुक माझी रे काया भिजवूनी

दह्या, दुधाची करीसी तू का चोरी...

सुदाम्या... जा रे जा माघारी

सुदाम्या... जा रे जा माघारीll२ll


गुपचूप येऊन पाठीमागून रे

वेणी आमची तू ओढू नको रे

वाट पाहे यशोदा माई नगरी...

सुदाम्या... जा रे जा माघारी

सुदाम्या... जा रे जा माघारी

सदाम्या... जा रे जा माघारीll३ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics