स्त्री स्वतंत्र आहे का
स्त्री स्वतंत्र आहे का
सांगा खरच खऱ्या अर्थानं
स्त्री स्वतंत्र झाली का?
कितीही शिकली सवरली तरी,
तिला चुल आणि मूल चुकलयं का?
सांगा खरंच खऱ्या अर्थानं
स्त्री स्वतंत्र झाली का? ll१ll
डॉक्टर, इंजिनीअर, वकिल, मंत्री वा उच्चअधिकारी असो
घरातील कामे तिला चुकलीत का?
सांगा खरंच खऱ्या अर्थानं
स्त्री स्वतंत्र झाली का? ll२ll
मुलगी, पत्नी, सून, आई अशा
अनेक भूमिका नी नातीगोती
सांभाळताना कर्तव्यास कुठे
चुकती का?
सांगा खरंच खऱ्या अर्थानं
स्त्री स्वतंत्र झाली का?ll३ll
मनात इच्छा आकांक्षा ठेवून
मुक्तपणे व्यक्त होऊ शकते का?
अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना
होणारी घुसमट कुणा कळते का?
सांगा खरंच खऱ्या अर्थानं
स्त्री स्वतंत्र झाली का?ll४ll
>
पुरुषांप्रमाणे स्वत:चे निर्णय घेवून
स्वत:साठी जगायला शिकली का?
अजूनही घरची परवानगी व
निर्णयाविना घराबाहेर पाऊल
टाकते का?
सांगा खरंचं खऱ्या अर्थानं
स्त्री स्वतंत्र झाली का? ll५ll
चुल, नी मूलं सांभाळून संसाराला
हातभार लावताना होणारी
तारेवरची कसरत कुणा दिसते का?
तरी तिला आपल्या माणसांकडून
कौतुकाची थाप कधी मिळते का?
सांगा खरंच खऱ्या अर्थानं
स्त्री स्वतंत्र झाली का?ll६ll
प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊनदेखील
कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक शोषण
आणि अत्याचार यातून ती वाचली का?
सांगा खरच देशामध्ये स्त्री सुरक्षित आहे का?
सांगा खरच खऱ्या अर्थानं स्त्री स्वतंत्र झाली का?
सांगा खरच स्त्री स्वतंत्र झाली का?ll७ll