STORYMIRROR

Archana Rahurkar

Romance

4  

Archana Rahurkar

Romance

सखुचा गं मेव्हणा

सखुचा गं मेव्हणा

1 min
481

करुन भरून नामानिराळा राहतोय ह्यो पाहुणा

मिसकॉल देवून हैराण करतोय सखुचा गं मेव्हणाllधृll


मी चवळीची शेंग ही कवळी

पाव्हणा म्हणून येतो हा जवळी

पारवाळ घुमतंय जसं डहाळी

पाती हले हळूवार लव्हाळी

डोळा मारुन छळतोय फोन लावतो बाई काना

मिसकॉल देवून हैराण करतोय सखुचा गं मेव्हणाll१ll


माझी ज्वानी आली भरात

खुले रुप माझं साज शृंगारात

चहुबाजूंनी बसला मेळा गं घरात

बसतो हा माझ्यासाठी झुरत

लाडीगोडी लावून नादी लावूनी करतो खाणाखूणा

मिसकॉल देवून हैरान करतोय सखुचा गं मेव्हणाll२ll


नटून थटून मी तयार होता

समोर येई आडवा जाता येता

गोड बोलत हळू बात छेडता

वाटे मज भीती हात धरता

नशीली नजर, मिशीला पीळ देवून करी हा चावटपणा

मिसकॉल देवून हैरान करतोय सखुचा गं मेव्हणाll३ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance