सांग सजनी
सांग सजनी
मी तुझा अन् तू माझी
सांग सजनी होशील का...?
तुज हृदयाच्या गाभाऱ्यात
थोडीशी मज जागा देशील का...?
सांग सजनी सांग मज
तु माझी होशील का ...?
ठेव विश्वास मजवरी
नाही देणार तूज धोका
का करतेस दुरावा
ठेऊ नको अबोला
तुझ्या माझ्या प्रितीला
हा चंद्र आहे साक्षीला
या चंद्राच्या साक्षीने
देते वचन मी तुजला
मी राजा अन् तू राणी
राणी बनवून ठेवीन तुजला
सांग राणी सांग
माझ्या जीवनात
तू येशील का ....?
तू माझी होशील का....?

