काय गुन्हा
काय गुन्हा
सोसून उन्हाचे चटके
केलं तुला मोठं बाळा
काय गुन्हा आम्ही केला
परी ना बसला मेळा.....
तवा ही होती माझ्या
पाठीवर हीच मोळी
आजही कमनशिबी
फाटकीच माझी झोळी....
नसन जरी शरीरी
ताकद आता उरली
तरीही अमुचा मान
शाबूत हाय असली
तवां ही मी खाल्ली
होती कष्टाची भाकर
मरता खेपही करी
या धरतीची चाकर
जरी एकला तरी मी
देवा एकच मागणं
माझीया मुलाबाळांच
ठेव सुखाच आंगण...
