तुझीया आठवणीत....
तुझीया आठवणीत....
सख्यारे.... तुझीया आठवणीत
मन माझे झुरतसे........
चोहीकडे तूच तु सर्वत्र तु
ध्यानी मनी तूच वसे......
तुझ्याच नादात, तुझ्याच बंधात
मी स्वतःस हरवते.........
कुणा सांगू, काय सांगू
हेच मनी कळतं नसे......
आरशात डोकावून पाहता
तुझेच प्रतिबिंब मज दिसे....
श्वासात तू,ध्यासात तू
मन मंदिरात तुच बसे.....
वाट तुझी पाहता पाहता
नेत्र माझे कधी न थके......
तुझे शब्द ऐकण्या सख्या
कर्ण माझे अधीर असे.....
प्रीत माझी कधी कळेल
हेच मला कळत नसे......

