अनमोल
अनमोल
सांज ढळली साजना
रातराणी ही फुलेना
सोडना रे अबोला
काय झाले मज सांगना.....
तुझ्यासाठी माळवा मी गजरा
श्रुंगार ही तुजसाठीच केला
रातराणी ही फुलली
गंध आसमंतात दरवळला.....
नभी चंद्रमा ही फुलला
चांदण्या ही बहरल्या
तुझ्या गालावरची खळी खुलू देना
साजना आता तरी बोल........
किती रे...... बहाना
सांगना माझ्या मोहना
आळवू किती तुला
ओठांची मोहोर खोलना........
तू मजसाठी किती अनमोल
सांगू कसं तुला साजना
आता तरी तुझी न माझी
प्रेरीत जुळू देना, मनमोहना.......

