अंश
अंश
आई मारू नकोस गं मला...
मी तुझाच अंश आहे
हळूच तुझ्या कुशीत शिरून
अंगाई गीत ऐकत निजायचं आहे
आई मारू नकोस गं मला......!
इवल्या इवल्या डोळ्यांनी
मलाही जग पहायचं आहे
बाबाच अन् तुझं बोट धरून
दुडूदुडू धावायचं आहे
आई मारू नकोस गं मला......!
मलाही कळीसारखं उमलू दे
फुलांसारखं फुलायचंय
बागेतल्या फुलपाखरांसारखं
इकडून तिकडून बागडायचंय
आई मारू नकोस गं मला.....!
मलाही खूप खूप शिकून
मोठ्ठ मोठ्ठ व्हायचं
मोठ्या पदावर नोकरी करून
तुझी अन् बाबांची सेवा करायचं
आई मारू नकोस गं मला.....!
तुला मी त्रास देणार नाही
असं वचन देते गं
सांग ना गं बाबाला
तुझे ते ऐकतील गं
आई मारू नकोस गं मला.....!
