मथुरेचा घाट
मथुरेचा घाट
1 min
172
चालून चालून पाय हे थकले
दुखतंय माझी पाठ.....
गं बाई बाई......मथुरेचा घाट
मी चालू कशी मथुरेचा हा घाट।धृ।
मऊशार लोण्याचा गोळा मोठ्ठा
चाटून कान्हा करतो चट्टा मट्टा
कान्हाची ही नेहमीच थट्टा
गं बाई बाई.....मथुरेचा हा घाट
मी चालू कशी मथुरेचा हा घाट।1।
खट्याळ कान्हा करीतो खोड्या
बळी पडे त्या गवळणी भोळ्या
साऱ्यांची तो लावतो वाट
गं बाई बाई.....मथुरेचा हा घाट
मी चालू कशी... मथुरेचा हा घाट
।।2।।
कान्हाच्या या लिलया मोठ्या
मागुन मारीतसे मोठ्या गोट्या
बीचारी राधा पडे चाट
गं बाई बाई....मथुरेचा हा घाट
मी चालू कशी..मथुरेचा हा घाट।3।
