STORYMIRROR

Bharti Lakhmapure

Others

4  

Bharti Lakhmapure

Others

मोहक रूप

मोहक रूप

1 min
162

किती साजरे... किती गोजिरे

रूप तुझे रे हरी...

सोंगे तू वटविलीस कितीतरी...

सावळ्या...दर्शन दे कधीतरी /धृ/


सावळे मोहक रूप तुझे बघोनी

सारा क्षिण जाये पळोनी

किती सावरे.. किती मोहरे

रूप तुझे रे हरी...

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या.. दर्शन दे कधीतरी/1/


जरी करे तू नटखट खोड्या

परी आवडे तू मज भारी

किती हासरे.. किती बावरे

रूप तुझे रे हरी...

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या..दर्शन दे कधीतरी/2/


Rate this content
Log in