STORYMIRROR

Bharti Lakhmapure

Others

3  

Bharti Lakhmapure

Others

सुर गवसला मला

सुर गवसला मला

1 min
150

जगण्यातला सुर गवसला मला

सख्यानों सुर गवसला मला.....

फुलाने शिकवले फुलायला,

फुलपाखराने बागडायला

सख्यानों सुर गवसला मला...!


नाही कोलमडणार मी दुःखात

हुरळून नाही जाणार सुखात

मी पुढेच चालत राहील 

जिवन गाणे गात गात

सख्यानों सुर गवसला मला....!


माझा ठाम आहे विश्वास

ध्येय मी माझे गाठील

ध्येय वेडी मी ललना

आनंद जीवनाचा वाटील

सख्यानों सुर गवसला मला....!


वार्याशी मी करील दोस्ती

पक्षाशीं सांगीन गुजगोष्टी

आकाशास घालून गवसणी

बाधींन आनंदाची घरटी

सख्यानों सुर गवसला मला....!


Rate this content
Log in