सावळ्या कृष्णमुरारी
सावळ्या कृष्णमुरारी
कान्हा...फसवू नको रे श्री हरी
मलाही...रूपदर्शन दे मुरारी
राधे कृष्णा.. राधे कृष्णा.. राधे कृष्णा
राधे कृष्णा..राधे कृष्णा..राधे कृष्णा...।धृ/
सावळा कृष्णमुरारी
वाजवीतो बासरी
तया बासरी स्वराने
राधा मंत्रमुग्ध बावरी
मलाही.. रूपदर्शन दे मुरारी
राधे कृष्णा.. राधे कृष्णा..राधे.. कृष्णा.../1/
कान्हाच्या दर्शनास
राधा व्याकुळ हरीणी
सर्वत्र शोधु लागली
सखीच्या ग गवळणी
मलाही.. रूपदर्शन दे मुरारी
राधे कृष्णा.. राधे कृष्णा..राधे कृष्णा/2/
सख्या साजना आता
नको पाहुस अंत माझा
तुझीया दर्शना ओढीने
कंठ दाटून आला माझा
मलाही.. रूपदर्शन दे मुरारी
राधे कृष्णा..राधे कृष्णा.. राधे कृष्णा/3/
