तुला पाहते रे मना
तुला पाहते रे मना
1 min
81
तुला पाहते रे मना
तुलाच मी शोधते
कधी न दिसे नेत्रांना
पण भाव तुझे जाणते.....
मना मनाच्या गाभाऱ्यात
स्वप्नी गरुड झेप वसे
पारंब्याच्या हिंदोळ्यावर
मन झोके घेत असे.....
सुसाट वाऱ्यांसोबत
बेफाम असे धावत
फुलपाखंरासोबत घेत गिरक्या
इकडेतिकडे असे हुंदळत....
रानीवनी भटकत असता
मन माझे झाले वेडेपीसे
का कुणास ठाऊक
मायेचा पाझर शोधत असे
फुलांफुलाच्या सुगंधातुन
सर्वत्र वाटण्यास आनंद
मध गोळा करत करत
प्रकाश बहरते मंद मंद.....
