हृृदय स्पंदन तू...
हृृदय स्पंदन तू...
माझ्या नयनांचा प्रकाश तू,
माझ्या हृृदयाचे स्पंदन तू..
माझ्या श्वासातला श्वास तू,
माझ्या देहातील प्राण तू...! १.
आभाळाची जशी निळाई,
सागराची जशी गहराई..
जशी फुलात कोमलता,
अन कोंभात मृृृदुलता,
तसाच माझ्या मनात तू...! २.
माझा चंद्रतू..चांदणी तुझी मी,
तेवणारा दिप तू..त्यातली ज्योत मी..
मी रिमझिम श्रावणसर,
मेघात बघ ओतप्रेत तू... ३.
उषा-रवीचे..भ्रमर फुलाचे,
नाते जसे रूतू गंधाचे..
तसेच असे तुझे अन माझे,
नाते हे भावभक्ती अन रूणानुबंधाचे...! ४.
तू धीर मनस्वी दु:खाचा,
माझ्या सर्वस्वी आनंदाचा..
तू संपन्न जाणीव माझी,
माझ्या शहाणीवेतही तुझ्या मनाचा... ५.
आरशातही प्रतिमा झळकते,
मिसळत्या पाण्यातील रंग तू..
भाग्य माझ्या हाती चमकते,
जगातले ईश्वरी रूप तू...! ६.
सोबत माझ्या क्षणोक्षणी तू,
आणि असशी समीप तू..
माझ्या श्वासातील श्वास तू,
माझ्या हृृदयाचे स्पंदन तू...! ७.

