वीतभर पोटासाठी...!
वीतभर पोटासाठी...!
भेटा फक्त आज मला
कामगार दिन आहे
वीतभर पोटासाठी
कामगार दीन आहे!
शोध घेतो मी सुखाचा
ओझे घेऊनी कष्टाचे
पाया उंच इमल्यांचा
भार वाही दगडांचे
कशासाठी ...पोटासाठी
हाती छन्नी नि हातोडे
धोंडे,दगड फोडतो
घेत टोपली फावडे
सुख समृध्दीपासून
कोंसोदूर मी राहतो
परि कळस महाली
इमानाने मी बांधतो
हात कापता कर्तव्यी
प्रामाणिक मी राहतो
भविष्यात कारखाना
बलराम मीच होतो!
नाणी छोटीशी मुठीत
परी जिद्द माझी मोठी
गरीबीशी झुंजण्यात
वीतभर पोटासाठी
सौ. प्रज्ञा घोडके,पुणे©®
