शीर्षक :- मनातील पाने कोरी...!
शीर्षक :- मनातील पाने कोरी...!
जीर्ण झालेल्या मनात
जरा डोकावून पाहिले
कोण जाणे कसे काय
मधे पान कोरे राहिले
काही पाने कोपर्याला
होती थोडीशी दुमडलेली
काही कोऱ्या पानावर
खूण होती ठेवलेली
आनंदाने लिहिलेले
पान हळूच ओरडले
किती वेळा वाचशील
तुझ्या मनाला भावलेले
मनातल्या त्या पानाला
होते एक पान जोडलेले
सुख-दु:खांच्या आठवणींत
छानसे विसावलेले
कधीतरी मधेच एक
पान कोरे राहिलेले
नाही पटले मनाला
म्हणून थोडे थांबलेले
घाव दु:खाचे सोसत
काही गुपचूप मुडपलेली
कधी आनंदी क्षणांनी
काही मोदाने भिजलेली
अंतरीच्या गुपितांना
काळजात जपलेली
मनातील पाने कोरी
मुद्दामहून ठेवलेली...
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
