शीर्षक :- अचानक तुझे जाणे...!
शीर्षक :- अचानक तुझे जाणे...!
भान ऋतूचे सरता
झाड निष्पर्णसे होणे
अशी तुझ्या स्मरणांची
शुष्क निष्पर्णशी पाने
वाट अंगार होताना
गुलाबांनी काटे होणे
खुणेवरी त्या भेटींच्या
छळतात आवर्तने
जाता आभाळ व्यापून
जसे तमाने धावणे
नभ टेकता क्षितिजी
मज तुझे भास होणे
रात्र काळोखी बेचैन
श्वास-श्वास अडकणे
पुन्हा स्वप्नात फिरूनी
अचानक तुझे येणे
थरथर अधरात
आत विराणी गोठणे
अन् दाटून कंठात
अश्रू नयनी वाहणे
आठवांच्या गर्दीमध्ये
मज श्वासांनी कोंडणे
अचानक तुझे जाणे
माझे अस्तित्व संपणे
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
