शीर्षक :- ध्येय असे ज्याचे ठायी...!
शीर्षक :- ध्येय असे ज्याचे ठायी...!
ध्येय असे ज्याचे ठायी
मन भावनेत गुंतत नाही
छंदात रमुनिया मग
स्वानंदाला शोधत राही
मान,अपमान सारे जरी
पायांना ओढत राही
माणूस माणसाला तोडे
अन हेच माणूस पाही
कर्तव्यात दक्ष राहून
करू नये चूक काही
नेमके अचूक वेधून हे
पडती फटकारे काही...
कामना अन वासनांची
नकोच लालसा काही
धर्म कोणता आपुला
हे तूची शोधत राही
होती हळव्या भावना
रुचतील मना काही
जरी ठेवूनी कामना
बोचतील मना काही
भक्त होऊनी सृजनाचे
रक्त सळसळते वाही
ध्येय असे ज्याचे ठायी
तोची कर्म करत राही
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
