STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

शीर्षक :- वर्ष सरत चाललंय

शीर्षक :- वर्ष सरत चाललंय

1 min
1


वर्ष सरत चाललंय

दिवसांचे पडदे हळूच मिटताना

आठवणींच्या सावलींचे रंग

मनात शांत गुंतताना..

काळाच्या या वर्णपटात

काही गारूडं,काही गंध,

आणि काही प्रश्न अजूनही

वार्‍यासारखे फिरताना...


गेल्या क्षणांनी शिकवलं

ओंजळीत वेळ थांबेना,

स्वप्नांच्या अंगणात यश-अपयश

दोन्हींचे सावट जमवेना..

तरीही मनाच्या आकाशाला

कधीच मर्यादांचं बंधन नसतं

कारण,

आशेचं तेज तर अंधारातही सतत 

दिव्यासारखं चमकतं...


वर्ष सरत चाललंय आणि मन 

उभं नव्याच्या दारात,

जुन्याचं ओझं ठेवून पुढचं पान उलगडतं..

कालचक्राचा हा गूढ फेरा शिकवतो एकच-

दर पडझडीमागे काही दडलेलं असतं,

पावलापावलांमागे एक अर्थपूर्ण ठसा उमटत नवा किनारा स्थिर,सशक्त,मंगल मिळावा नव्या स्वप्नांना,

अनुभवांची न ढळणारी शिदोरी 

विसरत नाही जुनं द्यायला जाताना.....



           प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational