स्त्री अत्याचार
स्त्री अत्याचार
करू नका
अत्याचार स्त्रियांवरती ,
स्त्रीच आहे या
जगाची उद्धारकर्ती .
अरे विसरू नका
तुमची आईसुद्धा स्त्रीच आहे ,
स्त्रीविना सृष्टीची उत्पत्तीच
शक्य नाही आहे .
अत्याचारी आणि बलात्काऱ्यांना
शिक्षा द्यावी ,
या गुन्हेगारांना लवकरात लवकर
फाशी द्यावी .
होताना हे अत्याचार लोक फक्त
बघत असतात तमाशा ,
अत्याचार होणाऱ्या स्त्रीला कोणतरी
वाचवेल अशी असते आशा .
आतातरी थांबायला पाहिजेत
स्त्रीवरील अत्याचार ,
आतातरी थांबायला पाहिजेत
स्त्रीवरील बलात्कार .
© धनराज संदेश गमरे
