तू जणू
तू जणू
1 min
659
स्वर्गतुल्य ह्या पृथ्वीची
तू जणू सुंदरा , अप्सरा ,
मी मात्र राजवाड्यातील
द्वारपाल देत उभा पहारा
सखे ! तू जणू रत्नजडित
सुंदर हार चमकणारा ,
मी खाणीतील काळा
कोळसा भट्टीत जळणारा
तुझ्यापुढे चंद्राची शोभा
काहीच नाही वाटत ,
आठवण येते वगैरे वगैरे
मात्र अश्रू नाही दाटत