शब्द माझे सोबती
शब्द माझे सोबती
1 min
77
लिहिताना असे वाटते
शब्द जणू माझे सोबती ,
कल्पनेत सुद्धा असते
साहित्य माझ्या भोवती .
लेखणीला बनवून
माझा खास मित्र ,
रेखाटत आहे मी
भविष्याचे चित्र .
शब्दांची बनत जाते
सुंदर अशी कविता ,
जगात या टिकून
रहावी मानवता .
