STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

मकर संक्रांत

मकर संक्रांत

1 min
426

जीवनात गुळातला

भरू मधूर गोडवा

पर्व संक्रांतीचे आले

स्नेह नात्यात वाढवा


जीवनाचा कडूपणा

दूर थोडासा सारु या

आली मकर संक्रांत

वाण प्रेमाचे वाटुया


तीळगूळ घेऊ देऊ

प्रेम संबंध वाढवू

भेदाभेद दूर सारू

क्रांती नवीन घडवू


आज संक्रांतीचा दिन

आनंदाची ही पर्वणी

चला  पतंग  उडवू

उंच निळ्या नभांगणी


दोर मध्येच तुटता

कुठं पडतो पतंग

कशी दुर्दशा होतसे

होतो रंगाचा बेरंग


जीवनाच्या पतंगाचा

दोर देऊ प्रभू हाती 

सांगे इति कर्तव्यता

सण मकर संक्रांती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational