STORYMIRROR

मराठी साहित्य मंच

Inspirational

3  

मराठी साहित्य मंच

Inspirational

भूक

भूक

1 min
206

संपता संपना l देवा ही रे भूक l

जीवास या धाक l तिचा सदा ll


भुकेपोठी देवा l व्याकुळतो प्राण l 

अन्नाचा हा कण l मिळवाया ll


जगणं झालं देवा l उधार हे सारं l

उदासीन वारं l सुटलंर ll


पोटासाठी देवा l हिंडे वनवन l

अंतकाठी प्राण l ठेऊनीया ll


कातड्याला आग l पडली भुकेने l

गरीबीचे जिणे l जगतांना ll


नका आता करू l अन्नाचे वाटोळे l

सर्वांशीच मिळे l पोटभर ll 


करणी ही देवा l तुझीच ही सारी l

नको वाऱ्यावरी l ठेवू कोणा ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational