एकाच नाण्याच्या दोन बाजू
एकाच नाण्याच्या दोन बाजू
एकाच नाण्याच्या दोन बाजू
दोन्हीही बरोबरच असतात
कोणतीही चूक नसते
सापेक्षतेने ती बदलत असते
ज्याचा त्याचा विचार
त्यानुसार बाजू बदलत असते
समाजात अनेक व्यक्ती असतात
ज्यांचे स्वभाव तसे असतात
'चित भी मेरी पट भी मेरी'
या उक्तीप्रमाणे प्रत्येकवेळी
माझेच बरोबर म्हणणारे.
काही माणसे द्विमुखी
घरात एक बाहेर एक
मुखात एक मनात एक
बाहेर शांत घरात अशांत
खायचे वेगळे दाखवायचे वेगळे
सुख आणि दुःख
छाप किंवा काटा
दोन्हीही हवेच असतात
जीवनात त्यांचा असतोच वाटा
ऊन पावसा प्रमाणे
चाले त्यांचा खेळ
एका बाजूने सुख तर
दुसऱ्या बाजूने दुःख
छाप काट्या प्रमाणे
एकाच नाण्याच्या दोन बाजू
एकाच जीवनात दोन्हीही
खेळत असतात
एकाच नाण्याच्या दोन बाजू
कधीच एकत्र येत नाहीत
दोन्ही डोळ्याप्रमाणे
एकानंतर एक
