STORYMIRROR

Yogesh Khalkar

Inspirational

3  

Yogesh Khalkar

Inspirational

आम्हाला सोडून...

आम्हाला सोडून...

1 min
440

आम्हाला सोडून तू गेलास

मागे आठवणींचं गाठोड ठेवून

तुझ्या हट्टापायी तू ओढावलस

अन् मागे सगळ्यांना रडवलंस ।। १।।


प्रत्येक फोटोत तू दिसतोस

मात्र गप्प गप्प राहतोस

आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना

अश्रूच्या पावसात आम्हांला भिजवतोस ।। २।।


तुझ्या अशा अवचित जाण्याने

जगाचं खरंच काय गेलं

तुझ्या घरातल्या माणसाचं जीवन

मात्र दुष्काळी रान झालं ।। ३।।


तुझ्या आठवणीने मन माझं

शोकसागरात सुन्न झालं

मनात दडवलेल्या शब्दांना जणू

मी आज मोकळ केलं ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational