STORYMIRROR

Yogesh Khalkar

Action Inspirational

3  

Yogesh Khalkar

Action Inspirational

सुकलेल पान

सुकलेल पान

1 min
193

झाडावरचं एक सुकलेल पान

आज ना उद्या गळणारच होत

त्याला ठाऊक नसल तरी

ते कधीतरी पडणार होत //१//


कधी फांदीवरती राहणारं पान

आता जमिनीवर पडणार होत 

कधी कोणाला सावली देणार 

स्वतः उन्हात सुकणार होत //२//


पानाच्या आयुष्यात हे असं

पहिल्यांदाच अघहित घडणार होत

झाडासाठी हे होत ननत्याच 

त्याचं कुठे अडणारं होत //३//


हे जग आहे झाड 

आपण आहोत साधे पान 

अडत नसते कोणाचे कोणावाचुन

फक्त ठेवा याचे भान //४//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action