तरूणाईच्या वळणावर ( सहाक्षरी )
तरूणाईच्या वळणावर ( सहाक्षरी )
आंतरी बदल
तीच तगमग
ताबा स्वतःवर
रहावे सजग....१
पडावे प्रेमात
वाटते मनस्वी
व्हावे स्वैरभैर
लुटावे सर्वस्वी....२
वेगात भन्नाट
चालवावी गाडी
नको ते हेल्मेट
सिग्नल ही तोडी....३
रहावे सदाच
मग पुढे पुढे
ऐकणे नकोच
कोणाचेच पाढे....४
तरुणाईच्या हो
या वळणावर
मोठयांचा घरात
राखावा आदर....५